अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या तरुणाची थरारक कथा : ‘रुद्रा’ लवकरच येणार (Marathi Film ‘Rudra’ Is A Thriller: Hero Excels As An Angry Young Man)

[ad_1]

वाईटावर चांगल्याची मात ही गोष्ट सर्वांनाच पाहायला आवडते, अशाच धाटणीचा व धमाल मस्ती असणाऱ्या ‘रुद्रा’ या मराठी चित्रपटाचा थरार येत्या १२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

एका क्रूरकर्मा अण्णा पाटील, नावाच्या व्यक्तीच्या कारवायांमुळे त्रस्त झालेले गाव व पुढे सरकणारे आगळे वेगळे कथानक प्रेक्षकांना थरारक अनुभूती देणार आहे, वाईटावर चांगल्याची मात, त्यातून वेळोवेळी कलाटणी देणारे कथानक त्यामुळे निर्माण होणारी स्थिती प्रेक्षकांना वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे.

‘माँ भवानी फिल्म’ या बॅनर अंतर्गत बनलेला हा चित्रपट अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ‘रुद्राच्या’ आयुष्यावर आहे. भावाच्या मृत्यूनंतर दुखावल्या गेलेल्या बहिणीने घेतलेली रुद्राची मदत व दुष्ट अण्णा पाटीलचा मृत्यू होत नाही तोपर्यंत “मी केस बांधणार नाही! अशी शपथ घेणारी बहीण, असे भक्कम व्यक्तिमत्व असणाऱ्या अण्णा पाटील समोर रुद्राचा निभाव लागेल का? भावाच्या मृत्यूनंतर दुखावलेली बहीण केस बांधेल? या सर्वच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना रुद्रा चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.

कित्येक दिवस असे थरारक चित्रपट मराठी सिनेसृष्टीत पाहायला मिळत नव्हते मात्र रुद्राच्या रूपाने एक वेगळीच पर्वणीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भन्नाट थरारक “रुद्रा, या चित्रपटाची निर्मिती अशोक कामले व दिपाली सय्यद यांची आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अशोक कामले व सुनील मोटवानी या दिग्गज दिग्दर्शकांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे सहाय्यक निर्माते प्रमोद कवडे व प्रमोद कामले आहेत. या चित्रपटात रुद्राच्या भूमिकेत  नव्या दमाचा नायक सिद्धार्थ असून, सिद्धार्थ व अपूर्वा कवडे यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडणार आहे.

त्याचबरोबर सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गजनी फेम प्रदीप रावत, दिपाली सय्यद, अनुप सिंग ठाकूर, निशिगंधा वाड ढोलकीच्या तालावर फेम माधुरी पवार, जानकी पाठक, विश्वेश्वर चव्हाण, विना जगताप, वैष्णवी करमरकर, अशोक कानगुडे, अशोक कामले, भूपेंद्र सिंग, दिलीप वाघ, बाळासाहेब बोरकर, संपदा भोसले, हरी कोकरे, विशाल राठोड, लक्ष्मण सालवा, संदीप कामले, निर्मल शेट्टी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे संगीत प्रवीण कुवर ,लहू महादेव बबली यांनी लयबद्ध केले असून, आघाडीच्या गायिका वैशाली माडे, सोनाली पटेल, संचिता मोरजकर, पौलमी मजुमदार, अनन्या मुखर्जी, अनुप सिंग ठाकूर, अशोक कांबळे, धम्मरक्षित रणदिवे या गायकांनी आपल्या मधुर आवाजात  चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली आहेत.[ad_2]

Leave a Comment